पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दरोड्याच्या गुन्ह्यात गेल्या सहा वर्षापासून फरार असणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. गणेश उर्फ प्रदिप बाळासाहेब गाडे (वय ३२, रा. आंबेडकरनगर, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फौजदार खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे पांडुरंग वांजळे व हवालदार हनुमंत गायकवाड पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना सहा वर्षापूर्वी दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार सराईत गाडे हा धायरी येथील गारमाळ येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गाडेला पकडले. त्याच्याविरुद्ध स्वारगेट, सिंहगडरोड, कोथरूड पोलिस ठाण्यात दोन दरोड्याच्या तयारीचे, गंभीर दुखापतीचा एक, पिस्तुल बाळगल्याचे तीन, इतर दोन असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.
ही कामरिगी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेद्र मोहिते, पांडुरंग वांजळे, हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने केली.