पुणे : बुहजननामा ऑनलाइन- शहर(Pune) पोलीस दलातील गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर आता गुन्हे शाखेत 9 अधिकाऱ्यासह 84 कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. यामध्ये (Pune)नवीन आलेले तसेच गुन्हेत पण इतर युनिटला गरज असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Pune : गुन्हे शाखेत 9 अधिकार्यांसह 84 कर्मचाऱ्यांच्या नेमणूका pic.twitter.com/SfZ5rFPRvA
— Policenama (@Policenama1) November 5, 2020
पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांची स्वारगेटवरून गुन्हे शाखेत व प्रकाश खांडेकर यांची वाहतूक शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर सुनील पंधरकर यांची दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीशैल चिवडशेट्टी यांनी युनिट 3, संदीप जमदाडे यांची युनिट 4 आणि उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांची युनिट 3 येथे नेमणूक केली आहे. तसेच उपनिरीक्षक दीपक माने यांची युनिट 4, गुंगा जगताप युनिट 3 सुनील कुलकर्णी यांची युनिट 1 येथे नेमणूक केली आहे.