पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्यावर लटकणाऱ्या केबलमुळे एका महिला पोलिसाचा अपघात झाला असून यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना खडकी-औंध रस्त्यावर (Khadki-Aundh Road) घडली. याप्रकरणी केबल टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. सरिता सीताराम डामसे Sarita Sitaram Damse (वय -26, रा. एसआरपीएफ ग्रुप, रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत सरिता डामसे यांचा भाऊ गणेश डामसे Ganesh Damse (वय-22 रा. पिंपळे गुरव) याने फिर्याद (Pune Crime) दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता डामसे या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) कार्यरत आहेत. ड्युटीवर हजर होण्यासाठी सकाळी डामसे या त्यांच्या दुचाकीवरुन जात होत्या. खडकी-औंध रस्त्यावरील पशुसंवर्धन कार्यालयासमोर (Animal Husbandry Office) रस्त्यात केबल लटकत होती.
लटकत असलेली केबल डामसे यांच्या दुचाकीच्या हँडलला गुंडाळली गेल्याने दुचाकी घसरली.
यामध्ये डामसे या जखमी झाल्याने त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात डामसे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
रस्त्यात निष्काळजीपणे केबल टाकल्याने अपघात झाल्याची तक्रार गणेश डामसे यांनी दिली आहे.
पुढील तपास पोलीस कर्मचारी अशोक वणवे (Police Constable Ashok Vanve) करत आहेत.
Web Title :- Pune Crime | Biker lady cop seriously injured due to cable falling on road, FIR against cable layers
हे देखील वाचा :
Amitabh Bachchan On BMC | कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कामाचे ‘बिग बी’नी केले कौतुक