पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पेट्रोल भरण्यासाठी रांग लागली असताना ती मोडून पुढे आलेल्यास रांगेत येण्यास सांगितल्याने मोटारसायकल चालकाने साथीदारांना बोलावून पेट्रोल पंपावर (Petrol Pump In Gokulnagar, Pune) धुडगुस घातला. (Pune Crime) याप्रकरणी संतोष शिवशरण यरगळ (वय ३९, रा. गोकुळनगर, कात्रज – Katraj) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.
ही घटना कात्रज – कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) गोकुळनगर (Gokul Nagar, Pune) येथील एम. के. खान पेट्रोल पंपावर (M. K. Khan Petrol Pump, Pune) बुधवारी रात्री १० वाजता घडली. पोलिसांनी दुचाकीचालकासह ४ ते ५ जणांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यरगळ हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत होते.
दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी अनेक जण रांगेत थांबले असताना दोन दुचाकीवरील चार जण रांग मोडून पुढे आले व आमचे गाडीत आधी पेट्रोल टाका असे म्हणाले. त्यावरुन पेट्रोल पंपावर काम करणारे मोहित सोडारी याने त्यांना रांगेत येण्यास सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने काही वेळाने दोन मोटारसायकलवरील चौघांनी इतर साथीदारांना बोलवून आणले. त्यांनी संतोष यरगळ, मोहित सोडारी व पेट्रोल पंपावरील मॅनेजर सलीम शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक घावटे अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Beating of three including manager of petrol pump on Katraj Kondhwa road Crime against four by Bharti Vidyapeeth Police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update