पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | तू पांढऱ्या पायाची आहेस, माहेराहून पैसे घेऊन ये असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण (Beating) केली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला वैतागून विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती, सासरे, सासू, दिर, नणंद यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) मांजरी, वालचंदनगर येथे घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी 31 वर्षीय विवाहित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) फिर्याद दिली आहे.
गुन्हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सांगवी पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती अजिनाथ हनुमंत कांबळे (Ajinath Kamble),
सासरे हनुमंत कांबळे (father-in-law Hanumant Kamble), सासु आनंदी कांबळे
(mother-in-law Anandi Kamble), दिर साईनाथ कांबळे आणि नणंद मनिषा चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिनाथ यांचे पीडित महिलेसोबत 2011 मध्ये लग्न झाले आहे.
लग्नानंतर पतीने पीडितेच्या इच्छेविरोधात अनैसर्गिक संभोग केला.
पीडितेने पतीला विरोध केला असता त्याने मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
तर इतर आरोपींनी माहेरवरुन पैसे घेऊन ये, तू पांढऱ्या पायाची आहे असे म्हणून पीडितेला शिवीगाळ व दमदाटी केली.
तसेच मारहाण करुन मानसिक (Mental) व शारीरीक (physical) त्रास दिला.
पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Beating a married woman as you are white footed FIR against 5 persons including husband
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update