पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | अनेकदा आपण आपली महत्वाची कागदपत्रे, त्याच्या झेरॉक्स काही कामासाठी देत असतो. पण त्याचा वापर नक्की कशासाठी केला जातोय याकडे लक्ष देत नाही. 63 वर्षाच्या वडिलांना नोकरी लावतो, असे सांगून त्यांचा आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन त्यांची काही कागदपत्रांवर सही घेऊन त्याद्वारे कर्ज काढून दुचाकी विकत घेऊन ती परस्पर तिसर्याला विकण्याचा प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) आकाश दशरथ पवार (वय 35), सतिश शिवाजी विटकर (वय 35, दोघे रा. नेहरुनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर येथे राहणार्या एका 25 वर्षाच्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (गु. र. नं. 669/21) फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2021 पासून आतापर्यंत पिंपरी व पुण्यातील पॅराडाईज कॅपिटलच्या कार्यालयात घडला आहे.
आरोपींनी राजू शंकर भोसले (वय 63) यांना नोकरीला लावतो, असे आमिष दाखविले. त्यांच्याकडून आधारकार्ड व पॅन कार्ड घेतले. तसेच काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर या कागदपत्रांचा वापर करुन त्यांनी भोसले यांच्या नावावर टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिस या कंपनीकडून 73 हजार 399 रुपयांचे कर्ज घेऊन त्याद्वारे टीव्हीएस कंपनीची स्टारसिटी प्लस मोटरसायकल खरेदी केली. ही मोटरसायकल कोणाला तरी परस्पर विक्री करुन त्यांची फसवणूक केली. घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबत कंपनीकडून त्यांच्याकडे विचारणा झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत. दरम्यान, आकाश पवार याने ही दुचाकी ज्यांना विकली त्यांनीही फसवणूक केल्याची फिर्याद दिली असून पिंपरी पोलिसांनी पवार विरुद्ध आणखी एक गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रमेशकुमार देवारामजी चौधरी (वय 38, रा. रावेत) यांना आकाश पवार याने टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी शोरुम कंडीशनमध्ये स्वस्तात
व सेकंड ओनर म्हणून नावार रजिस्ट्रेशन करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून 63 हजार रुपये रोख घेतले. त्यांच्याकडून कागदपत्रे देऊन त्यांचा प्रथम निळ्या रंगाची नवीन ज्युपिटर बिना नंबर प्लेटची दिली. त्यानंतर ती परत घेऊन दुसरी विनानंबर प्लेटची ग्रे रंगाची ज्युपिटर दिली. मात्र, पासिंग व सेकंड ओनर म्हणून रजिस्ट्रेशन करुन न देता फसवणूक केली.
Web Title :- Pune Crime | Be careful when handing over documents! Bought a bike with a loan on the documents showing the lure of the job.
Crime News | संतापजनक ! गरबा पाहून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार