पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | हात उसने दिलेल्या पैशावरून वाद झाल्यानंतर पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर येथील ससाणेनगर (Sasane Nagar, Hadapsar) भागात ही घटना (Pune Crime) घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी प्रथमेश आडाळे (वय 21, चिंतामणी नगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे.
त्यानुसार मोहन यादव, रोहित उर्फ बिडी, दादा मगर व इतर दोघावंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण नोकरी करतो. दरम्यान फिर्यादी व त्याचा मित्र गौरव यांची रोहीत उर्फ बीडी याच्यासोसबत हात उसने पैसे न दिल्यावरून वाद झाले होते.
त्याचा राग आरोपींच्या मनात होता. तर दोन दिवसांपूर्वी मोहन याने फोनकरून
फिर्यादी तरुणाला पुरोहित चौकात बोलावले.
फिर्यादी तेथे गेल्यानंतर रोहित याने त्यांना गाडीवर बसून चल असे सांगितले.
मात्र त्यांनी येण्यास नकार दिला. त्यावेळी या आरोपींनी संगनमत करत त्याला लाकडी
दांडक्याने बेदम मारहन करत त्याचे खुनाचा प्रयत्न केला आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत.
Web Title : Pune Crime | attempt to murder of youth by gang of 5 over money dispute, incident in Sasane Nagar, Hadapsar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !
Suicide News | खाणावळ चालवणार्या दांपत्याची आत्महत्या, दोघांचे मृतदेह आढळले कुजलेला अवस्थेत
Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण