पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | रागाने पाहिल्याच्या कारणावरुन दोन तरुणांवर चार जणांनी मिळून कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) लोहियानगर (Lohianagar) येथील सार्वजनीक रोडवर घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री साडेबाराच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ दूध डेअरी समोर घडली. खडक पोलिसांनी (khadak police) या गुन्ह्यात दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. तर त्यांचे दोन साथिदार फरार झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जुबेर उर्फ वडी मुश्ताक शेख आणि आकीब शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे साथिदार जिया अशरफ शेख (सर्व रा. लोहियानगर) आणि जैद शेख हे फरार झाले आहेत. याप्रकरणी फैजान मोहम्मद गौस शेख (वय-23 रा. मिठा नगर, गल्ली नं.7, कोंढवा) याने खडक पोलीस ठाण्यात (khadak police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर 307,323,504 कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सलमान हे श्रीनाथ दूध डेअरी (Srinath Milk Dairy) समोरील सार्वजनीक रोडवर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी जुबेर याने फिर्यादी फैजान याच्याकडे रागाने पाहिले. त्यावेळी तू माझ्याकडे रागाने का बघतोस अशी विचारणा फिर्यादी यांनी केली. यानंतर आरोपी जुबेर हा आपल्या साथिदारांसह त्या ठिकाणी आला.
‘आज तेरा और सलमान का हिसाब खत्म करता हूं’ असे म्हणत फिर्यादी आणि त्यांच्या मित्रावर कोयत्याने वार केले.
आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राच्या डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी केले.
तसेच जुबेर शेख याने हातातील कोयता हवेत फिरवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
जखमी फैजान शेख याच्या फिर्यादीवरुन खडक पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
पुढील तपास खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav) करीत आहेत.
Web Title : pune crime | attempt to murder case in khadak police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BJP vs Shiv Sena | CM उद्धव ठाकरे, फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
Pune Metro | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मेट्रो सेवा डिसेंबर अखेर सुरु होणार