पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | मुलाच्या वाढदिवसाच्या (Birthday) कार्यक्रमात नाचताना खुन्नस दिल्याचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. या प्रकरणी (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police Station) ठाण्यात 8 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी सुनिल महादेव पांडव Sunil Mahadev Pandav (वय 19, रा. संतोषनगर, कात्रज-Katraj) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ईशान शेख (Ishaan Shaikh), अमिन मुल्ला (Amin Mulla), जावेद मेहबुब मुल्ला Javed Mehboob Mulla (वय 27), अझर ऊर्फ अझरुद्दीन शेख (Azhar alias Azharuddin Shaikh) , प्रतिक काची (Pratik Katchi), शेखर ठोंबरे (Shekhar Thombre), तौफिक लाला शेख Tawfiq Lala Sheikh (वय 29, सर्व रा. संतोषनगर, कात्रज) व त्यांच्या इतर एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यातील जावेद मुल्ला व तौफिक शेख यांना अटक केली आहे. ही घटना कात्रजमधील संतोषनगरमधील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल पांडव यांचे मित्र सार्थक कुलकर्णी (Sarthak Kulkarni) यांच्याबरोबर संतोष मोरे (Santosh More) यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. आरोपीही या वाढदिवसाला आले होते. तेथून ते परत जात असताना ईशान शेख व अमिन मुल्ला यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र सार्थक यांचा रस्ता अडविला. ‘तू मला नाचताना खुन्नस का दिली’ असे बोलून त्यांनी सार्थक याच्य डोक्यात पाठीवर, कमरेवर, दोन्ही हातावर व उजव्या गुडघ्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. इतर आरोपींनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ईशान शेख व अमिन मुल्ला यांनी हातील काठी, कोयता हवेमध्ये फिरवीत ‘आम्हीच इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर खल्लास करुन टाकू’, अशाप्रकारे लोकांना धमकाविले. तेथील रिक्षा व चारचाकी गाड्यांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक घावटे (API Ghavte) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Case Bharti Vidyapeeth Police Station Crime News
हे देखील वाचा :
Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक