पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | ड्रेनेजचे पाणी फ्लॅटच्या ड्रेनेज लाईनला जोडल्याने ते पाणी घरात शिरल्यावर झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने वार करुन डोक्यात मारुन जीवे मारण्याचा (Attempt To Murder) प्रयत्न केला. (Pune Crime)
याप्रकरणी आसिफ वल्ली शेख (वय ३८, रा. भवानी पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शहबाज त्याचे वडील, आई, शहबाजचे साथीदार व दोन महिलांविरुद्ध खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अजमेरा पार्क (Ajmera Park, Kondhwa) येथे रविवारी दुपारी ३ वाजता घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मावशी रशिदा या अजमेरा पार्कमधील लेन नं. १ मध्ये राहतात. आरोपींनी त्याचे ड्रेनेजचे पाणी फिर्यादीच्या मावशीची परवानगी न घेतला. त्यांचे फ्लॅटचे ड्रेनेज लाईनमध्ये सोडले. त्यामुळे हे सांडपाणी मावशीच्या फ्लॅटमध्ये शिरले. त्याबाबत फिर्यादी यांनी शहबाज यांच्या वडिलांना सांडपाणी व्यवस्थित सोडण्याबाबत सांगण्यासाठी गेले होते. त्याचा राग येऊन त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. फिर्यादी यांच्या आईला शहबाज याच्या आईने चप्पल व हाताने मारहाण केली. शहबाज व त्याचे वडील हे कोयता घेऊन आले. कोयत्याने त्यांनी आत्याचा मुलगा इरफान शेख याच्या डोक्यात व पोटात मारुन त्याला जबर जखमी केले. फिर्यादी यांना कोयत्याने हातावर व त्यांच्या आत्याच्या डोक्यात मारुन जखमी केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Murder Kondhwa Ajmera Park
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल