पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | ते तिघेही मित्र, तिघांनाही गांजा ओढण्याचे व्यसन लागलेले. अशात गांजा ओढत असताना डोक्यात नशा चढली आणि त्यांनी काहीही कारण नसताना एकमेकांवर चाकूने वार केले़ त्यात तिघेही जखमी झाले आहेत.
ही घटना कोंढवे -धावडे येथील जन्नीआई मंदिरामागील मोकळ्या जागेत १८ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा (Pune Crime) वाजता घडला. हे तिघेही १५ व १६ वर्षांची मुले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उत्तमनगरमध्ये (Uttam Nagar) हे तिघे जण राहतात. त्यांच्या एका मित्रासह हे चौघे जण कोंढवे धावडे येथील मोकळ्या मैदानात रात्री साडेअकरा वाजता गांजा ओढत बसले होते. त्यावेळी काही कारण नसताना त्यांच्यात अचानक भांडणे सुरु झाली. १५ व १६ वर्षाच्या दोघा मुलांनी त्यांच्या दुसर्या मित्रावर चाकूने उजव्या गालावर व डोक्याच्या मागील बाजूला वार करुन जखमी केले.
त्यानंतर जखमी झालेल्याने त्याच्यावर वार करणार्या दोघांच्या बरगडीवर व कमरेवर वार करुन जखमी केले. तिघेही जखमी झाले असून उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) परस्पर विरोधी तक्रारी दाखल करुन घेतल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokde) अधिक तपास करीत आहेत.
web title: Pune crime attack of minor boys uttam nagar police case.