पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | किरकोळ वाद झाल्यानंतर प्रेयसीनं प्रियकरला तिच्या 2 मित्रांच्या मदतीने कारमध्ये नेऊन धु-धु धुतल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) कोंढवा (Kondhwa) परिसरात घडली आहे. त्याच्याजवळचे मोबाईल आणि पैसे काढून प्रेयसी पसार झाली आहे. तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी ओंकार सिंग Omkar Singh (वय 23, रा. उंड्री) या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार मित्र रियान खुराणा Ryan Khurana (वय 23) याला अटक केली आहे. तर प्रेयसी व आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime | कात्रजमधील कारखान्यात दोन कामगारांचे वाद, एकाच्या खुनाचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार आणि यातील आरोपी तरुणी यांच्यात गेल्या तीन वर्षापासून प्रेम संबंध होते. ओंकार हा उच्च शिक्षित असून, तो वडारवाडी येथे राहत आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यापासून त्याच्यात किरकोळ कारणावरून वाद होत असत. त्यातून भांडण देखील व्हायचे. तीन दिवसांपूर्वी ओंकार हा दुपारी नेहमीप्रमाणे बँकेत जाण्यासाठी निघाला होता. लिफ्टने तो खाली आल्यानंतर प्रेयसी तिच्या दोन मित्रांसोबत तेथे आली. त्यांनी ओंकारला कारमध्ये बसविलेआणि विश्रांतवाडी भागात नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्यावजवळचे दोन मोबाईल आणि दोन हजार रुपये काढून घेत प्रियसी मित्रासोबत पसार झाली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत (Kondhwa Police) आहेत.
Web Title :- pune crime argument between them after 3 years of love affair beloved girl with the help of 2 friends beat her boyfriend and robbed him fir in kondhwa
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update