पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने पेट्रोल पंपावर आलेल्या दोघा जणांनी कोयत्याचा धाक दाखवत कर्मचाऱ्याच्या खिशामधून 16 हजार रुपयांची रोकड चोरुन (Pune Crime) नेल्याचा प्रकार विमानतळ पोलिस ठाण्याच्या (Vimannagar Police Station) हद्दीत घडला आहे. ही घटना लोहगाव धानोरी रस्त्यावरील साठे पेट्रोल पंपावर घातली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी अतिश वैजनाथ कांबळे (वय 21 रा. वडगाव शिंदे, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
कांबळे साठे पेट्रोल पंपावर काम करतात. गुरुवारी पांढऱ्या रंगाच्या एक्टिवावरून दोन तरुण पेट्रोल पंपावर आले. त्यांनी 400 रुपयांचे पेट्रोल भरले. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता, एकाने ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे का अशी विचारणा केली. तर दुसरा थोडा लांब जाऊन उभा होता. त्याने शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि कांबळे यांच्या जवळ येऊन तुझ्याकडे आहे तेवढी सगळी कॅश काढून देईल असे म्हणत त्याचा खिशामध्ये हात घालून सोळा हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून चोरी करून नेली. याबाबत विमानतळ पोलिस (Vimannagar Police) पुढील तपास करीत आहेत.
Web Title :- pune crime | An employee was robbed at a petrol pump near Pune airport.
Rain in Maharashtra | विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Pune Crime | समर्थ पोलिसांकडून दुचाकी चोरट्यास अटक, वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस