पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्यात लावलेली गाडी बाजूला घेण्यावरुन झालेल्या वादात पोलिसाच्या (Pune Police) डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन टोळक्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पोलीस नाईक पी आर मोटे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कालीदास खांदवे (वय ३५, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव), माऊली खांदवे (रा. लोहगाव) व त्यांच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लोहगावमधील (Lohegaon) जगदगुरु पेट्रोलपंपाजवळ रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोटे हे कारमधून प्रतिक मटण शॉप येथे मटण घेण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांनी आपली कार पार्क केली. तेव्हा कालीदास खांदवे याने त्यांना गाडी बाजूला घे, असे सांगितले.
त्यावर मोटे यांनी मी पोलीस आहे़ थांब जरा असे सांगितले.
त्यानंतर दोघांनी त्यांच्याकडील मोटारसायकल आडवी लावून मोटे यांच्याबरोबर हुज्जत घातली.
खांदवे याने फोन करुन साथीदारांना बोलावले.
मोटे यांना मारहाण करुन त्यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारुन गंभीर जखमी केले.
सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | An attempt to kill a policeman by putting a cement block on his head; Incidents in Airport area
हे देखील वाचा :
Punit Balan Group | टेनिसपटू अंकिता रैना आणि पुनीत बालन ग्रुपमध्ये सामंजस्य करार