पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) जामीनावर सुटल्यानंतर गुन्हेगाराची त्याच्या साथिदारांनी पुण्यात दुचाकी रॅली काढली होती. गुन्हेगाराची दुचाकी रॅली (Bike rally) काढणे साथिदारांना चांगलेच महागात पडले आहे. गुन्हेगाराची रॅली काढणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या (Pune Crime) खंडणी विरोधी पथक एकने (Anti extortion Cell) मुख्य आरोपीसह तिघांना अटक (Arrest) केली आहे.
वैभव ऊर्फ पप्या शांताराम उकरे (वय-22 रा. कर्वेनगर), सुयश उर्फ मनोज संजय दिघे (वय-22 रा. कर्वेनगर), आशिष उर्फ शुटर मच्छिंद्र माने (वय-22 रा. वडारवस्ती, कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्या उकरे विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात उकरे व त्याचा साथीदार येरवडा कारागृहात होता. त्या दोघांना 8 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला (Bail granted) होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर वैभव, सुयश आणि आशिष यांच्यासह 30 ते 35 जणांच्या टोळक्याने येरवडा कारागृह ते कर्वेनगरपर्यंत (Karvenagar) दुचाकीवर रॅली काढली (Pune Crime) होती.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रॅली काढणारा वैभव उकरे, मनोज दिघे हे दोघे कोथरुड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे (Pandurang Wanjle) व यशवंत ओंबासे (Yashwant Ombase) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तिसरा आरोपी आशिष माने याला वडारवस्ती परिसरातून अटक केली.
Web Title : Pune Crime | after his release from yerwada jail two wheeler rally pune polic crime branch arrest criminals
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,095 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
Anil Deshmukh | विदर्भातील उमद्या नेत्याची कारकीर्द अटकेने ‘काळवंडली’
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर…’