पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – मुलीचे अपहरण (Kidnapping) करुन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात (Pune Crime) आरोपीला विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे (special judge S. P. Ponkshe) यांनी जामीन मंजूर (bail granted ) केला आहे. 23 जानेवारी 2021 रोजी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मुलीला राहत्या घरातून पळवून नेले होते. आरोपीने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन पळवून नेल्याची तक्रार फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police) दिली होती. त्यानुसार सुरुवातीला भा.द.वि. कलम 363 नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला. Pune Crime | Accuse of rape case get bail in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी आरोपीला 31 मे 2021 रोजी अटक केली. त्याच्यावर भा.द.वि कलम 366 (अ),376 (2) (एन) व पोक्सो कलम 4, 8,12 नुसार कलम वाढ केली. या गुन्ह्यामध्ये आरोपीची 25 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आरोपी महंमद मुबारक शेख (Mohammed Mubarak Sheikh) याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
आरोपीतर्फे अॅड. प्रताप परदेशी (Adv. Pratap Pardeshi) यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. मजहर मुजावर (Adv. Mazhar Mujawar), अॅड.अजिंक्य खैरे (Adv. Ajinkya Khaire) यांनी जामीन अर्ज दाखल केला.
सुरुवातीला पीडिताच्या आईने कलम 363 नुसार जानेवारी महिन्यात अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपीला मे महिन्यात अटक करण्यात आली.
दि.10 जून 2021 रोजी पीडिताने मुलाला जन्म दिला असून आरोपी व पीडित या दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत.
तसेच दि.23 जानेवारी 2021 पासून दोघेही एकत्र राहत असून पीडिताने स्वतःच्या वैद्यकीय तपास करण्यास नकार दिला आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला.
Web Title : Pune Crime | Accuse of rape case get bail in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान