पुणे/शिरुर : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Accident News | रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने भरधाव वेगातील कार आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात (Pune Crime Accident News) एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Death) झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पुणे-नगर रोडवरील (Pune-Nagar Road) शिरुर तालुक्यातील कारेगाव जवळील फलके मळ्यानजीक मंगळवारी (दि. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुदाम शंकर भोंडवे (वय-66), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय-60) कार्तिकी अश्विन भोंडवे (वय-32), आनंदी अश्विन भोंडवे (वय०4 सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अश्विन सुदाम भोंडवे (वय-35) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ते कार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंडवे कुटुंब हे अश्विन यांच्या चाकण (Chakan) येथील मेहुण्याला लग्नासाठी
पाहुणे बघायला येणार असल्याने ते आई-वडिल, पत्नी आणि मुलगी यांच्यासह इंडिका (एमएच12 ईएम 2978)
मधून चाकणच्या दिशेने जात होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करुन उभ्या असलेल्या कंटेनरवर (Container) त्यांची कार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम आणि सिंधुताई भोंडवे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (Ranjangaon MIDC Police Station)
पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे (Police Inspector Balwant Mandge) हे पोलीस पथकासह घटनास्थळी
दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनरखाली घुसलेली कार बाहेर काढली व तरुणांच्या मदतीने जखमी
व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime Accident News | Pune shirur accident four members of same family killed in an accident motor collided with a container crime news
Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना