पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पतीला दुसरे लग्न करायचे असल्याने सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. दीपाली समाधान गायकवाड Deepali Saadhan Gaikwad (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या (Suicide In Pune) केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी जयश्री दुर्योधन सोनवते Jayashree Duryodhana Sonvate (वय ४८, रा. राहुलनगर, निगडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समाधान मारुती गायकवाड Samadhan Maruti Gaikwad (रा. केशवनगर, मुंढवा, मुळ बीड) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मुंढव्यातील केशवनगर येथे गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता.
दोन वर्षापासून समाधान हा मला दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून दीपाली हिला तू माझ्या आयुष्यातून निघून जा,
नाही तर मी तुला मारुन टाकीन असे बोलत असे.
तिला शिवीगाळ करुन वारंवार मारहाण (Beating) करीत असत.
या छळाला कंटाळून दीपाली हिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी समाधान गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बिनवडे (Sub-Inspector of Police Binawade) तपास करीत आहेत.
Web Title : – Pune Crime | A married woman commits suicide because she is tired of being harassed by her husband for wanting to marry again Incidents in Keshavnagar Mundhwa
हे देखील वाचा :
Rain in Maharashtra | राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट
Pune Crime | कोंबडीचे मटण का आणले नाही म्हणत डोक्यात दगड घालून खून; लोणीकंद परिसरातील घटना