पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | ‘स्मार्ट सिटी मॉडेल’ (smart city model) म्हणुन निवड करण्यात याालेल्या ‘औंध-बाणेर’ (aundh-baner) येथील ब्रेमेन चौकात (bremen chowk) मुतारीच्या पााठीमागे गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला (Pune Crime) असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फैय्याज जावेद मणियार (वय 24, रा. गोखलेनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणियार हा खासगी ठिकाणी काम करत होता.
तो राहण्यास गोखलेनगर येथे होता. तो एकुलता एक असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, फैय्याज व त्याचा एक मित्र येथील ब्रेमेन चौकात (bremen chowk) असलेल्या स्वच्छतागृहाजवळ गेले होते. काल दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेले होते. त्यातच फैय्याज श्वच्छतागृहात न जाता त्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत गेला.
त्याठिकाणी या श्वच्छतागृहात आलेली लाईटची वायर होती.
त्या वायरमध्ये फैय्याजचा हात अडकला आणि त्याला शॉक लागला. भिजलेली वायर आणि पाणी यामुळे फैय्याज याचा शॉकलागून जागीच मृत्यू झाला.
त्याच्या मित्राने हा प्रकार सांगितला. माहिती मिळताच चतुःशृंगी पोलिसांनी (chaturshringi police) येथे धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (senior police inspector Rajkumar Waghchoure) यांनी सांगितले.
दरम्यान फैय्याज हा लघुशंका करण्यासाठी गेला असावा असा अंदाज आहे.
पण नेमका श्वच्छतागृहाच्या पाठीमागे तो का गेला हे समजू शकलेले नाही.
तसेच, हा भाग पुणे स्मार्टसिटी अंतर्गत स्मार्टसिटी मॉडेल म्हणून निवडला गेलेला आहे.
त्याचठिकाणी एका तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
Web Title : Pune Crime | A 24-year-old man died of shock at Bremen Chowk in Aundh-Baner area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोने 150 रुपये तर चांदीच्या दरात 600 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव