पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | आलेल्या नैराश्येतून एका २३ वर्षाच्या तरुणाने हाताची नस कापून घेऊन कात्रज (Katraj News) येथील भिलारेवाडी तलावात (Bhilarewadi Dam) उडी मारुन आत्महत्या (Suicide in Pune) केली. शंकर बसवराज कलशेट्टी Shankar Basavraj Kalshetty (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कलशेट्टी याने रविवारी रात्री उशिरा आपल्या घरच्यांना आपण आत्महत्या करीत असल्याचा मेसेज केला. माझ्या जीवनात काही समस्या आहेत. त्या मी सोडवू शकत नाही आणि प्रॉब्लेम घेऊन जगू शकत नाही, असा मेसेज केला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याचा मेसेज पाहताच घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे (Bharti Vidyapeeth Police Station) धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत त्याचा शोध घेतला. तरी त्याचा शोध लागू शकला नाही. आज सकाळी पोलीस भिलारेवाडी येथील तलावाच्या परिसरात त्याचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना त्याची चप्पल तेथे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी एकाच्या मदतीने अग्निशामक दलाला याची माहिती दिली.
त्यानंतर अग्निशामक दलाच्या (fire brigade pune) जवानांनी तलावात शोध घेऊन आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शंकर याचा मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर (Pune Crime) काढला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
Web Title : Pune Crime | A 23-year-old man committed suicide by jumping into a pool after cutting a vein in his hand due to depression.