Pune Crime | पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर करुन काढले 90 लाखांचे कर्ज

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पॅनकार्ड (PAN Card), आधार कार्डचा (Aadhaar Card) नंबर वापरुन कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून त्यावर ७५ लाखांचे व्यवहार केले. त्या आधारे बँकेतून ९० लाखांचे गृह कर्ज (Home Loan) घेऊन फसवणुक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत मुकुंदराज बाबुराव पाटील (वय ४०, रा. परभणी – Parbhani) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११२/२२) दिली आहे. हा प्रकार २ सप्टेबर २०२१ पासून आतापर्यंत घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पॅन कार्ड व आधार कार्डचा नंबर तसेच त्यांच्या नावाचा
वापर करुन कोणीतरी त्यांचे पॅन कार्ड व आधार कार्डवर त्यांच्या ऐवजी दुसर्याचा फोटो लावून बनावट कार्ड (Bogus Card) तयार केले.
त्या आधारे आयडीबीआय बँकेच्या एरंडवणा शाखेत एम पी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स फर्मचे बनावट खाते (Fake Or Bogus Bank Account) उघडले.
या खात्यावर २०२१ ते २०२२ मध्ये ७५ लाख १५ हजार रुपयांचे व्यवहार केले.
बनावट पॅन कार्ड व आधार कार्डचा वापर करुन त्यांनी फिर्यादीचे नावावर पिंपरी चिंचवड येथील आयसीआयसीआय बँकेतून (ICICI Bank, Pimpri Chinchwad) ९० लाख रुपयांचे गृह कर्ज घेऊन फिर्यादी व बँकेची फसवणूक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सपताळे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | 90 lakhs loan taken using PAN card, Aadhaar card
हे देखील वाचा :
Pune Crime | वसुलीसाठी आलेल्या गुंडांकडून महिलेच्या अंगाशी ‘झोंबा-झोंबी’; हडपसरच्या काळेपडळमधील घटना
Pune Crime | रिक्षाचालकाने मारहाण करुन प्रवाशाला लुटले
Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड
Comments are closed.