पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरातील (Pune Crime) दत्तवाडी परिसरात सामुहिक बलात्काराचे प्रकरण (Dattawadi, Gang Rape Case) समोर आल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दोन घटना ताज्या असतानाच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharti vidyapeeth police station) हद्दीतील दत्तनगर परिसरात (Dattanagar, Katraj) एका 63 वर्षीय नराधमाने एका 23 वर्षाच्या मुलीकडे पाहून भरदिवसा हस्तमैथुन (masturbation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात (Pune Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर 354 (अ) 509 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
या घटनेमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.
हा प्रकार शनिवारी (दि.28) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दत्तनगर (Dattanagar) परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पाणी मरात होती. त्यावेळी आरोपी तिच्याकडे पाहून हस्तमैथून करत असल्याचे निदर्शनास आले. हा किळसवाणा प्रकार भरदिवसा घडला आहे. पीडित तरुणीने याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्ररीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
Web Titel : Pune Crime 63 year old man doing masturbates in afternoon and looking toward 23 years old girl in pune huge excitement
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना सीबीआयची क्लिन चिट? CBI च्या उपअधीक्षकांनाच वाटत नाही आरोपात तथ्य