Pune Crime | सराईत चोरट्याकडून वाहन व मोबाईल चोरीचे 6 गुन्हे उघडकीस

Pune Crime 6 cases of vehicle and mobile theft from Sarait thief revealed

पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याच्या खबरीवरुन पकडलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 2 वाहन चोरी व 4 मोबाईल चोरीचे गुन्हे (Pune Crime) उघडकीस आणण्यात समर्थ पोलिसांनी (Samarth Police) यश आले आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सुलतान रिजवान शेख (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.
समर्थ पोलीस ठाण्याचे (Samarth Police Station) तपास पथक स्वातंत्र्य दिनानिमित्त गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना नाना पेठेतील (Nana Peth) आझाद आळीमध्ये चोरटा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची बातमी मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दुचाकीवर असलेल्या चोरट्याला पकडले.
त्याच्याकडील मोबाईलबाबत चौकशी केल्यावर त्याने तो नाना पेठेतून चोरल्याचे सांगितले.
त्याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने दीड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच दोन दिवसांपूर्वी सासवड येथून आणखी एक दुचाकी चोरली असल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून दोन दुचाकी व 4 मोबाईल असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीकडील 3 मोबाईलच्या मालकांचा शोध सुरु आहे.

ही कामगिरी परिमंडळ- 1 च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (DCP Dr. Priyanka Narnaware), सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr. PI. Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश भालेराव, पोलीस अंमलदार जितेंद्र पवार, धिरज शिंदे, सुमित खुट्टे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली आहे.

Web Title : Pune Crime | 6 cases of vehicle and mobile theft from Sarait thief revealed

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Covid 19 Compensation | कोरोनाने मरणार्‍यांच्या कुटुंबियांना किती मिळेल भरपाई? ठरवण्यासाठी सरकारला SC कडून मिळाला आणखी 4 आठवड्यांचा वेळ

Pune Crime | ‘ड्राय डे’च्या दिवशी चाकूचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्या दारुच्या बाटल्या