इंदापूर / बाभुळगाव : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | जागेच्या वादातून 8 जणांनी एका 23 वर्षाच्या विवाहितेचा विनयभंग करत पाच जणांना कोयता, काठी आणि विटांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडला आहे. हा प्रकार (Pune Crime) बावडा येथे घडला असून इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) 8 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र तानाजी कांबळे, जयशिंग तानाजी कांबळे, शुभम राजेंद्र कांबळे, विश्वजित राजेंद्र कांबळे, बुद्धभुषण राजेंद्र कांबळे, जोत्सना बाबासाहेब कांबळे, गौतमी जयशिंग कांबळे, सुमन जयशिंग कांबळे (सर्व रा.सर्व बावडा, ता.इंदापूर, जि.पूणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असुन आरोपी फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. याप्रकरणी विवाहित महिलेने (वय – 23) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
फिर्यादीने म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा वालचंदनगर चौकाजवळ फीर्यादी यांचे वडील अनंता बनाजी कांबळे यांचे नावावर 250 स्के.फुट गावठाण जागा व आजी पार्वती बनाजी कांबळे यांच्या नावावर 210 स्के. फुट गावठाण जागा आहे. या जागेत जोत्सना बाबासाहेब कांबळे हीने अतिक्रमण करून पोल रोवत असताना फीर्यादी व तीचे वडीलांनी यांनी हरकत घेतली. यानंतर ही घटना घडली. या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार के. डी शिंदे (Police Constable K D Shinde) हे करत आहेत.
Web Title : Pune Crime | 5 persons were beaten with saws and sticks in a land dispute, FIR was registered against 8 persons
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 96 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
BJP MLA Madhuri Misal | तळजाई वन्य प्रकल्पाला भाजपचा विरोधच – आमदार माधुरी मिसाळ
Milind Soman | शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?