पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | फेसबुकद्वारे (Facebook) ओळख झाल्यानंतर एका महिलेला परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी तबल 18 लाख रुपये उकळले आहेत. त्यांना कस्टम ड्युटी म्हणून पैसे (custom duty payment) भरण्यास भाग पाडले गेले आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) वानवडी पोलीस (wanwadi police) ठाण्यात 43 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट (IT Act), फसवणूकीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फेसबुकवर खाते (Facebook Account) आहे. एकाने त्यांना फ्रेंड रिव्हेस्ट पाठवली होती. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात ओळख निर्माण झाली व ओळखीतून बोलू लागले. त्याने परदेशात बड्या कंपनीत आधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांना परदेशातून गिफ्ट पाठवत असल्याची बतावणी केली.
काही दिवसांनी त्यांना गिफ्ट दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडले आहे.
गिफ्टमध्ये पैसे देखील असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे ते सोडवून घ्यावे असे सांगितले.
यावेळी कस्टममधून बोलणाऱ्या व्यक्तींनी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून तबल 18 लाख 12 हजार रुपये उकळले. तरीही त्यांना गिफ्ट मिळाले नाही
. तर परत वेगवेगळी कारणे सांगत पैसे भरण्यास सांगत होते.
पण, त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास वानवडी पोलीस (wanwadi police) करत आहेत.
Web Title : Pune Crime | 43 year-old woman from Pune meets youth through Facebook youth cheats Rs 18 lakh
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरट्यांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना