Pune Crime | ऑडी खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्राद्वारे मिळविले 40 लाखांचे कर्ज; बँक मॅनेरजरसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime | 40 lakh loan obtained through forged documents to buy Audi car A case has been registered against four people including the bank manager at chandannagar police station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | ऑडी कार (Audi Car) खरेदी करण्यासाठी बनावट कोटेशन (Fake Quotation) तयार करुन बँक मॅनेजरशी (Bank Manager) संगनमत करुन ४८ लाख रुपयांच्या कारसाठी ४० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले. बनावट खाते (Fake Account) उघडून त्यात हा धनादेश (Check) वटवून ४० लाखांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वृषाली गव्हाणे Vrishali Gavane (वय ४०, रा. कोरेगाव भीमा, शिरुर – Shirur) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन ज्ञानदेव सातपुते Sachin Gyandev Satpute (रा. चंदननगर), गजानन ज्ञानेश्वर साकोरे Gajanan Dnyaneshwar Sakore (रा. केंदूर, शिरुर), राहुल लोंढे Rahul Londhe (रा. विश्रांतवाडी) आणि कुलदीप शर्मा Kuldeep Sharma (रा. दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २ फेब्रुवारी २०१६ रोजी घडला होता. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऑडी गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांच्या पतीच्या नावाने अंशुल मोटर्स (Anshul Motors) या बनावट शोरुमचे पतीच्या नावे कोटेशन तसेच इतर कागदपत्रे अण्णासाहेब मगर बँकेत (Annasaheb Magar Bank) सादर केली.
बँकेचा मॅनेजर राहुल लोंढे याने संगनमत करुन या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारे पडताळणी अगर तपासणी न करता फिर्यादीच्या पतीच्या नावे सचिन सातपुते याला गाडी खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.
आरोपींनी चंदननगर येथील सुवर्णयुग सहकारी बँकेत (Suvarnayug Cooperative Bank)
अंशुल मोटर्स या नावाने बनावट खाते उघडले.
त्या खात्यात ही कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली.
ही रक्कम या चौघांनी गाडी खरेदीसाठी न वापरता परस्पर ती रक्कम काढून अपहार करुन फसवणूक (Cheating Case) केली.
सहायक पोलीस निरीक्षक गोलांडे (Assistant Police Inspector Golande) तपास करीत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | 40 lakh loan obtained through forged documents to buy Audi car A case has been registered against four people including the bank manager at chandannagar police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | निलेश घायवळ टोळीचा सदस्य आणि गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या रोहित आखाडे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 92 वी कारवाई

White Tea For Weight Loss | ‘हा’ चहा पिल्याने हमखास कमी होईल वजन, चेहर्‍यावरील सुरकुत्या सुद्धा होतील गायब

Pune Crime | ग्राहकांवरुन ताडपत्री व्यावसायिकांमध्ये हाणामारी; टोळक्याने तलवारीने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, फरासखाना पोलिसांकडून दोघांना अटक