Pune Crime | बदनामीकारक संदेश पाठवून तरुणाची 13 लाखांची फसवणूक

Pune Crime News | Contacted from Google as money did not come from ATM; Bank account emptied by cyber thief

पुणे : बहुजननामा ऑनलाइनPune Crime | किरकोळ कर्ज (Loan) घेतल्यानंतर मागणी नसताना त्याच्या खात्यात पैसे पाठविले. त्याचे पैसे व्याजासह परत करण्याची मागणी करुन परिचितांना बदनामीकारक संदेश पाठवून एका तरुणाला सायबर चोरटे (Cyber Thieves) तब्बल 9 महिने छळत (Pune Crime) होते. त्याच्याकडून त्यांनी 13 लाख 87 हजार 765 रुपये उकळले. (Pune Cyber Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी आंबेगाव येथे राहणार्‍या एका 30 वर्षाच्या तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 सप्टेबर 2021 ते 2 जून 2022 दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा सरकारी नोकरी (Government Job) करतो. त्याला अनोळखी फोन आला. त्याने फिर्यादीला कॅश अडव्हान्स (Cash Advance) व स्मॉल लोन हे अ‍ॅप्लीकेशन (Small Loan Application) मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी इन्स्टॉल केल्यावर त्यांच्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो व इतर माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागली. त्यानंतर त्यांनी मागणी केली नसतानाही त्यांच्या बँक खात्यात किरकोळ पैसे पाठविले. हे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली फिर्यादी यांच्याकडून खंडणी (Ransom) मागितली.

 

आरोपींनी त्यांना व मोबाईलमधील संपर्क यादीतील लोकांना फिर्यादीबद्दल अश्लील व बदनामीकारक संदेश पाठविले.
आणखी बदनामी नको, म्हणून ते मागणी करतील, तसे फिर्यादी पैसे देत गेले.
आतापर्यंत त्यांनी 13 लाख 87 हजार 765 रुपये दिले. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस निरीक्षक चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | 13 lakh fraud of youth by sending defamatory messages pune cyber crime

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation-PMC | पुणे महापालिकेकडून 68 रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक डोस उपलब्ध; 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना डोस मोफत

CM Eknath Shinde | ‘आता आपलं सरकार, शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही’ – एकनाथ शिंदे

Madras High Court | पत्नीने मंगळसूत्र काढणं ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता; उच्च न्यायालयाचा निर्वाळा