पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | घरकामगार म्हणून काम करताना चहा, पाणी तसेच जेवणात गुंगीचे औषध घालून घरातील व्यक्ती बेशुद्ध झाल्यावर मौल्यवान ऐवज चोरणाया एका महिला चोरास वानवडी पोलिसांनी तमिळनाडूतून अटक (Pune Crime) केली. गेल्या तीन वर्षात तिने कोरेगाव पार्क, बंडगार्डन, येरवडा, खडक, समर्थ, लष्कर, वानवडी आणि कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायट्यांत ११ चोर्या केल्या आहेत. त्यात चोरलेला ६० लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी तिच्या तमिळनाडू (tamilnadu) येथील तीच्या घरातून ताब्यात घेतला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शांथी चंद्रन (वय ४३, रा. अन्नाई नगर, वेगनीकल, तिरूलअन्नमलई, तमिळनाडू) असे अटक केलेल्या मोलकरीण महिलेचे नाव (Pune Crime) आहे. या प्रकरणी मधुबाला प्रवीण सेठिया (वय ६०, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरात आठ एप्रिल रोजी सायंकाळी चोरी झाली होती. फिर्यादीच्या घरी काम करीत असताना शांथी हिने कपाटात ठेवलेले १० लाख ५२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. नवीन ठिकाणी काम सुरू केल्यानंतर ती चार ते पाच दिवस काम करीत. त्यानंतर घरातील व्यक्तींचा विश्वास संपादित करीत. त्यानंतर गुंगीचे औषध खाद्यपदार्थांत घालून घरातील दागिने चोरून नेत.
या प्रकरणाचा तपास करीत वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) शांथी हिला तमिळनाडूतून अटक केली. चोरीला गेलेला मुद्देमाल आणि या गुन्ह्यात तिला मदत करणार्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तिला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अंजना नवगिरे (Public Prosecutor Anjana Navagire) यांनी केली होती. न्यायालयाने तीला २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
web title: Pune crime 11 thieves in koregaon park bundgarden yerawada khadak samarth lashkar wanwadi and kondhwa in pune goods worth rs 61 lakh seized from housewife.
OMG | दारूची नशा चढल्यानंतर ‘या’ कारणामुळे इंग्रजी बोलू लागतात लोक, रिसर्चमध्ये हैराण करणारा खुलासा