पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Court | फेसबुकवर (Facebook) महापुरूषाविषयी खोटी व बदनामीकारक पोस्ट टाकणार्या 38 वर्षीय महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने (Pune Court) फेटाळून लावला. न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर (Judge B. P. Kshirsagar) यांनी हा आदेश दिला. याबाबत 30 वर्षीय व्यक्तीने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे.
19 जुलै ते 19 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिने जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Government Advocate Premkumar Agarwal) यांनी विरोध केला. आरोपीने धार्मिक भावना दुखवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट फेसबुकवर केल्या आहेत. तिला जामीन मंजूर झाल्यास ती अशाच आक्षेपार्ह पोस्ट करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता आहे. संबंधित पोस्टच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करणे बाकी आहे. तिला जामीन दिल्यास ती साक्षीदारांना धमकाविण्याची शक्यता आहे. गुन्हयाचा तपास करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे असल्याचा युक्तिवाद अॅड. अगरवाल यांनी केला. न्यायायलयाने तो मान्य करत जामीन अर्ज फेटाळला.
Web Title : pune court the womans bail application was rejected in the case of defamation of national leader
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Junner News | खोट्या शिवभक्त ‘अक्षय बोऱ्हाडे’वर पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप