Pune Court News | लाच प्रकरणात वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकाऱ्याला CBI विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Court News | पुणे येथील केंद्रीय वस्तू व सेवा कर महानिदेशालाय (DGGI) याचे वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी राहुल कुमार ओम प्रकाश चौधरी याचा विशेष CBI सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ॲड. राकेश सोनार (Adv Rakesh Sonar) यांनी आरोपीच्या वतीने जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता. वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा जमीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात हरियाणा येतील तक्रारदार यांच्या कंपनीत सदरचे आरोपी हे छापा टाकून तपास करत असताना सदर तक्रारदार यांच्याकडून सदर तपासात मदत करण्यासाठी 50 लाखाची लाच मागितली. परंतु तक्रारदार यांना सदरच्या प्रकरणात त्यांना 50 लाखाची लाच देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदार यांनी पुणे येथे CBI लाचलुचपत विभागाकडे अर्जदार आरोपीच्या विरुद्ध तक्रार दिली.
सीबीआयने तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकरणात तपास केला असता सीबीआय पुणे यांना राहुल चौधरी या लोकसेवकांनी 50 लाखाची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्याविरुद्ध विशेष CBI न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालय कोठडी मध्ये घेतल्यानंतर हा अंतरीम जामीन अर्ज ॲड. राकेश सोनार यांनी दाखल केला. त्याला सीबीआयने व सीबीआयचे विषय सरकारी वकील यांनी आरोपीस जामीन होण्यास विरोध केला. आरोपीच्या वतीने कोर्टात युक्तिवाद करतानाना ॲड.राकेश सोनार यांनी आरोपी लोकसेवक यांना कशाप्रकारे खोट्या पद्धतीने या प्रकरणात गुंतवलेला आहे हे कोर्टाच्या निदर्शनात आणून दिले. हा युक्तिवाद गृहीत धरून विशेष CBI न्यायालयाने आरोपीचा एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
या प्रकरणात अॅड. राकेश सोनार यांना उमंग यादव, प्रज्वल पवार, ऋत्विक जाधव, कुमार खराडे, अॅड. प्रणव जोशी, अॅड. विनय साबळे , ओंकार वीर यांनी सहकार्य केले.
Comments are closed.