पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Court | मोक्कानुसार (MCOCA) कारवाई झालेला आणि फसवणूक, जीवे मारण्याची धमकी यासह विविध कलमांनुसार गुन्ह्या दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे (Ravindra Barate) याला घरात आश्रय दिल्याप्रकरणी वकिलाला मोक्का न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Judge S. R. Navander) यांनी हा आदेश (Pune Court) दिला.
ॲड. सागर संजय म्हस्के Adv. Sagar Sanjay Mhaske (वय 32, रा.म्हस्के वस्ती, आळंदी रस्ता) असे जामीन झालेल्या वकिलाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) त्याला अटक केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याने अॅड.. तुषार चव्हाण (Adv. Tushar Chavan) यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यांना ॲड. विपिन मिश्रा (Adv. Vipin Mishra ) आणि ॲड. शंकर कदम (Adv. Shankar Kadam) यांनी सहाय केले. ॲड. म्हस्के याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे.
तपासासाठी त्याच्या ताब्याची गरज नाही. त्याला मोक्का लागू होत नसल्याचा युक्तीवाद अॅड. तुषार चव्हाण यांनी केला. त्यानुसार न्यालालयने हा निकाल दिला आहे.
या गुन्ह्यात बऱ्हाटे, त्याची पत्नी, मुलासह 21 जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
बऱ्हाटेवर मोक्कासह एक डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो फरार असताना आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे ॲड. सागर म्हस्के याच्या घरात राहात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ॲड. सागर याला अटक केली आहे. त्याच्यावरही मोक्का, ॲट्रॉसिटीसह भादवीचा विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
web title: Pune court court decides on bail application of lawyer who gave thara to ravindra barhate at home during absconding period find out.
Crime News | पतीच्या निधनानंतर वृद्ध पत्नीनेही केली 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
Crime News | स्विमिंग पूलमध्ये महिला पोलिसासोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपाधीक्षकाला अटक