Pune Court | हॉटेल चालकांकडून खंडणी वसुल करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाला जामीन

pune court bail to sub inspector of police for collecting ransom from hotel operators

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Court | मुंढवा भागातील (Mundhwa) तीन हॉटेलमधून सात हजार रुपयांची खंडणी उकळणा-या पोलिस उपनिरीक्षकाला (PSI) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे (First Class Magistrate A. S. Deshpande) यांनी हा आदेश (Pune Court) दिला. बुधवारी रात्री त्याला उशीर अटक करण्यात आली होती.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मिलन कुरकुटे (PSI Milan Kurkute) असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कुरकुटे हा हिंजवडी पोलिस ठाण्यात (hinjewadi police station) नियुक्तीला होता. गेल्या २१ ऑगस्टपासून तो वैद्यकीय कारणावरून रजेवर होता. मंगळवारी तो रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुरकुटे आपल्या चारचाकी गाडीतून गणवेशात मुंढव्यातील हॉटेल लोकल गॅसस्ट्रो ॲन्ड बार (Hotel Local Gastro & Bar) येथे गेला. ताबडतोब हॉटेल बंद करा. नाही तर मी तुमच्या हॉटेलवर कारवाई करीन, असे हॉटेलचे व्यवस्थापक मारुती गोरे यांना बजावले. त्यावेळी गोरे यांनी त्याला आमच्या हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नसल्याचे सांगितले. त्यावर कुरकुटे याने गोरे याला सांगितले की, मी आयुक्तालयातून आलो आहे. तुमचे हॉटेल चालू होते.

त्यामुळे कारवाई होवू द्यायची नसेल तर मला दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जबरदस्तीने २ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने हॉटेल वन लॉन्जमध्ये जाऊन दोन हजार रुपयांची खंडणी घेतली. दोन्ही ठिकाणी खंडणी घेतल्यानंतर कुरकुटे याने एबीसी रस्त्यावरील हॉटेल कॉनिव्हल गाठले. ते हॉटेल बंद असताना मॅनेजर किशोर थापा याला हॉटेल उघडण्यास भाग पाडून त्याच्यावर कारवाईची धमकी देऊन तीन हजार रुपयांची खंडणी जबरदस्तीने घेतली, असे तक्रारीत नमूद आहे. अटक झाल्यानंतर कुरकुटे याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्यांला न्यायालयाने जामीन मंजूर केला. कुरकुटे याने ॲड. अमेय डांगे (Adv. Ameya Dange) यांच्यामार्फेत जामीनासाठी अर्ज केला होता. पोलिस उपनिरीक्षक एच. एस. गिरी (PSI H. S. Giri) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : pune court bail to sub inspector of police for collecting ransom from hotel operators

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्‍यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम

Mobile SIM | तुमच्या Aadhar card वरून किती मोबाइल SIM Card आहेत सुरू? ‘टॅफकॉप’द्वारे एका क्लिकवर मिळवू शकता माहिती; जाणून घ्या