पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corporation |नदी सुधार कार्यक्रमा अंतर्गत जपानच्या जायका कंपनीने (jayka company japan) महापालिकेच्या (pune corporation) वतीने काढण्यात येणाऱ्या निविदातील अटीशर्ति मान्य केल्या आहेत. यामुळे बराच काळ रखडलेल्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया महिन्याभरात पार पडून लवकरच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुळा मुठा नदी (mula mutha river pune) सुधार योजने अंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन नदी पात्रात सोडण्यत येणार आहे.
सुमारे बाराशे कोटी रूपयांच्या या प्रकल्पासाठी जपान स्थित जायका (jayka company japan) या कंपनीने 850 कोटी रुपये अर्थसहाय्य केले आहे.
मात्र, 2016 पासून या प्रकल्पाच्या निविदा, ठेकेदार, सल्लागार कंपनी तसेच अटीशर्ति विविध कारणास्स्तव वादग्रस्त ठरल्या आहेत. यामुळे यामागील काही वर्षापासून हे काम रखडले.
यावर प्रशासनाने पुन्हा डीपीआर मध्ये तसेच निविदाच्या अटीशर्ति मध्ये सुधारणा केल्या आहेत.
तसेच या कामासाठी इच्छुक कंपन्यांनी केलेल्या सूचनाचाही त्यामधे समावेश करून अंतिम मान्यतेसाठी जायका कंपनी कडे पाठवल्या होत्या.
जायका ने त्याला आज मान्यता दिली.
जायका ने दिलेल्या तत्वतः मान्यतेसह सर्व अटी शर्ति आज निविदेसोबत अपलोड करण्यात आल्या आहेत. पुढील चार आठवडे निविदा भरण्याची मुदत देण्यात येणार आहे.
त्यानंतर आलेल्या निविदा मान्य केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
अशी माहिती पालिकेतिल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
–
नदी सुधार प्रकल्पासाठिच्या निविदा प्रक्रियेतिल सर्व अडथले दूर झाले आहेत.
जायका कंपनीच्या नियमानुसारच सर्व पूर्तता करण्याची तांत्रिक प्रक्रिया पार पाड़ावी लागली.
ती आज पूर्ण झाल्याने निविदा प्रक्रिया अधिक वेगाने होईल.
येत्या काही दिवसात नदी सुधार प्रक्रलपाचे काम सुरु होईल.
प्रकल्पाचे काम विहित मुदतित पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर (mayor murlidhar mohol)
Web Title : Pune Corporation | Under the River Improvement Program, the terms and conditions of the tender to be drawn up by pune Corporation to Japan’s Jaika Company are accepted, the tender process will be completed within a month and work will start soon.
Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई
Porn films case | राज कुंद्राचे पाॅर्न व्हिडिओच्या व्यवहारांसाठी 5 WhatsApp ग्रुप