पुणे : बहुजननामा ऑनलाईन – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात पुणे पालिकेच्या (Pune Corporation) कर (Tax) आकारणी आणि संकलन विभागाने नवीन 22 हजार मिळकतींवर कर आकारणी केली आहे. या पाच महिन्यात बांधकाम विभागाने देखील 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Standing Committee Chairman Hemant Rasane) यांनी दिली. महापालिकेचे (Pune Corporation) उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला महसुल समितीची बैठक (Revenue Committee Meeting) घेण्यात येते. पालिकेच्या विविध विभागांकडून उत्पन्न वाढीसंदर्भात आढावा घेतला जातो. आढावा बैठकीनंतर रासने पत्रकारांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महापालिकेच्या मिळकत कर विभागाने नव्याने 22 हजार मिळकतींवर कर आकरणी केली आहे.
तर मागील वर्षी नवीन 42 हजार मिळकतींवर कर आकारणी सुरु केली.
दोन वर्षापुर्वी वर्षभरात सरासरी 20 ते 22 हजार मिळकतींवर नव्याने कर आकारणी केली जात होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे.
कर आकारणी आणि संकलन विभागाने देखील उत्पन्न वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहेत.
आकारणी आणि संकलन विभागाने ज्या मिळकतींवर कर आकारणी झाली नाही, अशा मिळकती शोधून त्यावर कर आकारणी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच बेकायदा बांधकामांवर कर आकारणी करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
यंदाच्या वर्षी बांधकाम शुल्कातून एक हजार 185 कोटी रुपये मिळेल असे गृहीत धरले असून पहिल्या पाच महिन्यात 600 कोटी रुपये जमा झाले आहेत.
जीएसटीमधून (GST) 2 हजार 193 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असून त्याचा हिस्सा राज्य सरकारकडून (State Government) नियमितपणे पालिकेला मिळत आहे.
याशिवाय मुद्रांक शुल्कापोटी (Stamp duty) मिळणारे 300 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकले आहेत.
ही थकबाकी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
यातील 34 कोटी रुपयांचा पहीला हप्ता मंगळवारी महापालिकेला मिळाला आहे.
उर्वरीत रक्कम ही दिवाळीपुर्वी आणि दिवाळीनंतर टप्प्या टप्प्याने महापालिकेला मिळणार आहे.
Web Title : Pune Corporation | Tax on 22,000 new properties in the first 5 months The construction department got Rs 600 crore
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक