• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Corporation | जंबो हॉस्पीटलची उभारणी PMRDA कडून पण निवडणुकीच्या तोंडावर ‘महापालिका भवन’ बनले राजकिय आखाडा; पुणेकरांची होतेय कोंडी

by nageshsuryavanshi
February 10, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corporation | जंबो कोव्हीड सेंटरमधील (PMC Jumbo Hospital) कथित भ्रष्टाचाराची तक्रार (Corruption Complaint) देण्यासाठी ‘सुट्टीच्या’ दिवशी महापालिका भवन (Mahapalika Bhavan) येथे आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya), त्यांना शिवसैनिकांनी (Shivsainik) केलेली धक्काबुक्की आणि आता भाजपकडून महापालिका भवनच्या पायर्‍यांवर सोमय्या यांचा सत्कार हा संपुर्ण ‘राजकिय स्टंट’ आहे. आगामी निवडणुकीच्या (PMC Elections) तोंडावर ‘महापालिका भवन’चा राजकिय आखाडा करण्यात आला असून सर्व यंत्रणा वेठीस धरण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. (Pune Corporation)

मार्च २०२० मध्ये पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत संसर्गान अक्षरश: थैमान घातले. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावरील उपायांबाबत जगातील आरोग्य यंत्रणा दिशाहीन असताना रुग्णसंख्या आणि बळींची संख्या भयावह वाढत गेली. मोठ्याप्रमाणात नागरीकरण झालेल्या पुण्यात मुंबईपाठोपाठ सर्वाधीक रुग्ण आढळल्याने देशपातळीवर पुणे रेड झोनमध्ये राहीले. रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडस्, ऑक्सीजन आणि डॉक्टर व मेडीकल रिपोर्ट स्टाफची कमतरता मोठ्याप्रमाणावर जाणवत असताना अक्षरश; उपचाराअभावी अनेकांनी रस्त्यावर, ऍम्ब्युलन्समध्येच प्राण सोडले. (Pune Corporation)

या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पुढाकार घेउन पुणे व पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) मध्ये तात्पुरते जंबो हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जंबो हॉस्पीटलसाठी अगदी उभारणीपासून ते संचलनापर्यंतची निविदा प्रक्रिया राबविणे व पाठपुरावा करण्याची जबाबदारी पीएमआरडीए कडे होती. पुणे महापालिकेने समन्वयासाठी मनुष्यबळाचे सहकार्य केले. तसेच औषध पुरवठ्याची जबाबदारी पार पाडली. राज्य शासन आणि महापालिकेकडेही डॉक्टर्स व मेडीकल स्टाफची कमतरता असल्याने पीएमआरडीएनेच लाईफलाईन या संस्थेला काम दिले. ऑगस्टमध्ये जंबो हॉस्पीटल सुरू करण्यात आले. जेमतेम आठवडाभर या संस्थेने काम केल्यानंतर त्यांची कार्यपद्धती तितकीशी समाधानकारक नसल्याचे समोर आल्याने तातडीने त्यांचे काम काढून घेत मेडब्रो या संस्थेकडे काम देण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लाईफलाईन या संस्थेकडे जंबो हॉस्पीटलचे काम देण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यानंतर ते महापालिका भवन येथे आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी आले. विशेष असे की शनिवारी महापालिकेला सुट्टी असतानाही ते महापालिकेत आले होते. त्यांच्या या दौर्‍याची त्यांनी प्रसिद्धीही केली होती. त्यामुळे सोमय्या हे महापालिकेत येणार असल्याची अगोदरच माहिती असलेले शिवसैनिक मोठ्यासंख्येने महापालिकेत आले होते. विशेष असे की महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा एखाद दुसरा पदाधिकारी वगळता सोमय्या यांच्यासोबत सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांसोबत कोणीच नव्हते.

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

यावेळी शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळात सोमय्या महापालिका भवनच्या पायर्‍यांवर कोसळले. किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना तातडीने संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसर्‍या दिवशी रविवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. रविवारी महापालिकेला सुट्टी असतानाही पुन्हा सोमय्या महापालिकेत आले आणि गेटवरच सुरक्षा रक्षकाकडे तक्रारीचे निवेदन देउन गेले. यानंतर गेली आठवडाभर सोमय्या व भाजपच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याची अगदी गल्लीपासून दिल्लीपासून जोरदार प्रसिद्धी केली.
एवढेच नव्हे तर भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शुक्रवारी ११ फेब्रुवारीला महापालिका भवनच्या पायर्‍यांवर जिथे सोमय्या कोसळले तेथेच त्यांच्या सत्काराची घोषणा केली.

मुळातच जंबो हॉस्पीटलमध्ये लाईफलाईन संस्थेची नेमणूक पीएमआरडीएने केली
असताना किरीट सोमय्या यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यामागील हेतुबाबतच संशय निर्माण होत आहे. मागील दोन वर्षे एकत्रितपणे कोरोनाशी लढा देउन पुणे शहर पुर्वपदावर आणण्यासाठी झटणारे पालिकेतील सर्व पदाधिकारी व नगरसेवक, प्रशासन आणि स्वंयसेवी संस्था यापैकी एकजण देखिल सोमय्या यांच्यासोबत नसणे, खुद्द भाजपच्या स्थानीक पदाधिकार्‍यांनीही लाईफलाईन अथवा मेडब्रो संस्था व अन्य खर्चांबाबत एकही आरोप न करणे हे मुद्दे मात्र या चर्चेतून बाजूला पडले आहेत. परंतू मागील शनिवारी महापालिका भवनच्या आवारात झालेल्या गोंधळामुळे प्रशासन बॅकफुटला गेले आहे. प्रशासनाने पालिकेतील प्रवेशावर मर्यादा आणल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही वेठीस धरण्यात येउ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

 

Web Title :- Pune Corporation | PMC Jumbo Hospital was set up by PMRDA but in the run up to elections, ‘Mahapalika Bhavan’ became a political arena

 

Maha Vikas Aghadi | बीडनंतर ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेनेने दिला थेट ‘पालकमंत्री हटाव’ चा नारा

Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ ! जाणून घ्या किती वाढणार पगार

Tags: Corruption Complaintjumbo hospitalKirit Somaiyalatest marathi newslatest news Pune Corporationlatest Pune CorporationMahapalika Bhavanmarathi in Pune Corporationpimpri-chinchwadPMC Electionspunepune corporationpune corporation latest news todaypune corporation marathi newsPune Corporation NewsPune Corporation today marathitoday’s pune corporation newsकिरीट सोमय्याजंबो कोव्हीड सेंटरपिंपरी-चिंचवडपुणेमहापालिका भवन
Previous Post

Maha Vikas Aghadi | बीडनंतर ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेनेने दिला थेट ‘पालकमंत्री हटाव’ चा नारा

Next Post

Damage Notes Exchange | ‘फ्री’मध्ये बदलता येणार फाटलेल्या नोटा; संपुर्ण पैसे परत मिळणार?, जाणून घ्या सविस्तर

Next Post
Damage Notes Exchange | know about rbi rules for damaged notes exchange marathi news

Damage Notes Exchange | 'फ्री'मध्ये बदलता येणार फाटलेल्या नोटा; संपुर्ण पैसे परत मिळणार?, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal
क्राईम

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | महिलेला वारंवार लॉजवर घेऊन जाऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन एका...

Read more
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
 Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | jammu kashmir major army operation in kulgam jammu and kashmir 2 terrorists surrendered

Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Eknath Shinde | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला उद्या भेट देणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा

7 days ago

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

6 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवींचं नाव निश्चित; भाजप-शिवसेना सामना?

4 days ago

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!

4 days ago

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम

4 days ago

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat