पुणे : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसापूर्वी पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत संलग्न असलेल्या 23 गावांचा समावेश करण्यात आला. यावरून आता महापालिकेत (Pune Corporation) गदारोळ झाला आहे. समाविष्ट केलेल्या 23 गावांचा विकास आराखडा कोण करणार यावरून मनपा सत्ताधारी आणि विरोधकांत वाद सुरु आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (ramdas athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुण्याची हद्दवाढ झालीय,म्हणून आणखी काही गावे घेऊन 2 महापालिका कराव्यात अशी भूमिका मांडली. तसेच मागील साडे चार वर्षांमध्ये भाजप आणि आरपीआयने चांगल्या पद्धतीने काम केलेत, म्हणून पुन्हा पुणे महापालिकेत आमचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. Pune Corporation | BJP and RPI will come to power in Pune Municipal Corporation again; Faith of Ramdas Athavale
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) हे आज पुण्यात होते. त्यावेळी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे पुणे महापालिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देण्यात आला. त्यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर रामदास आठवले यांनी माध्यमांशी सवांद साधला.
रामदास आठवले बोलताना म्हणाले, ‘कोरोनाचा सामना करण्यात पुणे महापालिकेला यश आले आहे. बेड,
ऑक्सिजन, औषधे मिळवून देणे, रुग्णालय उभे करणे अशी कामे केली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
(PM Narendra Modi) देखील यशस्वीपणे कोरोना काळात काम केले. रोज चव्वा चार लाख केसेस येत
असल्याने नकारात्मक चर्चा होत होती, परंतु, या काळात मोठी यंत्रणा उभी केली आहे. तिसरी लाट आली तरी त्यासाठी सक्षम यंत्रणा आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन राज्यांना देखील मदत केली आहे. असं रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढे आठवले म्हणाले, ‘पुण्यात SRA योजना करताना ती बिल्डरांना परवडत नाही, म्हणून 4.5 FSI दिल्यास अनेक ठिकाणच्या योजना मार्गी लागतील. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये RPI च्या उमेदवारांनी मित्र पक्षाचे चिन्ह वापरले तर आम्हाला फायदा होईल. पण विधानसभेसाठी आमचे स्वतंत्र चिन्ह असेल. असे देखील आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar), सभागृहनेते गणेश बीडकर (Ganesh Beedkar) , नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr. Siddharth Dhende) आदी यावेळी उपस्थित होते.
Web Title : Pune Corporation | BJP and RPI will come to power in Pune Municipal Corporation again; Faith of Ramdas Athavale
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update