पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 3 हजार 463 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात तब्बल 35 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील 30 आणि पुण्याच्या बाहेरील 5 जणांचा समावेश आहे.
सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 686 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 लाख 2 लाख 18 हजार 663 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 30 हजार 832 रूग्ण अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनामुळं शहरातील 5 हजार 191 जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 621 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात तब्बल 2 हजार 584 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 17 हजार 633 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 3 हजार 463 जणांची कोरोना टेस्ट ही पॉझिटिव्ह आली आहे.