पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1639 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज दिवसभरात कोरोनाचे 2053 नवे पॉझिटिव्ह समोर आले असून त्यामध्ये 909 रूग्ण हे पुर्वीचे असल्याचे महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. आज दिवसभरात पुण्यातील 37 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 22 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 2549 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या पुणे शहरात 1 लाख 7 हजार 958 कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 88 हजार 579 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 16 हजार 830 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 912 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 480 हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.