पुणे : बहुजननामा ऑनलाइन – coronavirus news updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 239 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 367 रुग्ण कोरोनामुक्त (coronavirus news updates) झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली. सध्या शहरामध्ये 3 हजार 320 इतके सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सक्री रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 73 हजार 539 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 61 हजार 763 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8456 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6076 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 519 रुग्ण गंभीर आहेत. तर 923 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज पर्यंत शहरात 25 लाख 67 हजार 412 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कृपया हे देखील वाचा:
Latur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री, शेतकर्यांची राजरोसपणे लूट ! ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत
Gangrape | रात्री ओली पार्टी अन् सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या
1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार ! जाणून घ्या किती खर्च करावा लागेल