बहुजननामा ऑनलाईन
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे समोर येणार्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 1909 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुणे शहरातील 42 जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तब्बल 23 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 2748 वर जाऊन पोहचली आहे. दिवसभरात 1 हजार 464 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 17 हजार 679 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 97 हजार 489 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 442 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 910 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 473 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.