Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1384 जण ‘कोरोना’मुक्त

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. अनलॉक 4 ची नियमावली केंद्र सरकार पाठोपाठ आज राज्य सरकारनं जाहीर केली असून आता आंतरजिल्हा प्रवास करण्यास ई-पासची गरज नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज, सिनेमा हॉल बंदच राहणार असल्याचं देखील सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1384 जणांनी कोरोनावर मात केली असून ते रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 876 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुणे शहरातील 37 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 19 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या 2304 वर जावून पोहचली आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 95373 आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 78070 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 14999 कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 884 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 528 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.