पुणे जिल्ह्यामध्ये सध्या 5 हजार 179 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर महापालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 8 हजार 869 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. तर पुणे विभागात हेच प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के असून आजपर्यंत 5 लाख 54 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Corona in Maharashtra : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11141 नवीन रुग्ण, 38 जणांचा मृत्यू
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोना महामारी पुन्हा आपले डोके वर काढताना पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात...
Read more