Pune Corona Updates | दिलासा ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 7410 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Updates Comfort 7410 patients corona free in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona Updates) रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 4136 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7410 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन (Omycron) बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

शहरात आजपर्यंत 42 लाख 93 हजार 630 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 24 हजार 684 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 74 हजार 297 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 214 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली होती.
मात्र आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. पुणे शहरामध्ये सध्या 41 हजार 173 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 368 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 41 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 38 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 3.47 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 12 हजार 816 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Corona Updates | Comfort! 7410 patients corona free in Pune city in last 24 hours find out other statistics

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

हे देखील वाचा

Keshav Upadhye | ‘आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या…’ टिपू सुलतान नामकरणावरुन भाजपची शिवसेनेवर खरमरीत टीका

How To Increase Breast Size | ब्रेस्ट साईज वाढवणे आणि त्यास योग्य आकार देण्यासाठी रोज करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

Corporator Pramod Bhangire | प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यावतीने मैदानी स्पर्धांचे आयोजन

Lata Mangeshkar | लता मंगेशकरांच्या तब्येतीत सुधारणा; वेन्टीलेटर काढण्यात आलं, कुटुंबाने मानले चाहत्यांचे आभार

Janhvi Kapoor Latest Movie Mr and Mrs Mahi | जान्हवी कपूर सोबत दिसला ‘हा’ मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटर; फोटो झाले व्हायरल