Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा! ‘कोरोना’ची रुग्णसंख्या पन्नासच्या आत, गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Update) प्रादुर्भाव कमी झाला आहे. आज शहरातील रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आली असून आजपर्यंतची ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 44 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 131 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 649 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 044 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 60 हजार 411 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 49 हजार 921 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 01 हजार 145 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 65 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 07 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 08 रुग्ण आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 23.66 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona Update | No patient dies in last 24 hours, know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Sugar Control | शुगर कंट्रोल करायची असेल तर दररोज ‘या’ एका फळाचे करा सेवन, जाणून घ्या कोणते
Gas Price Hike | …सबसिडीच्या घरगुती म्हणून गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार ?
Comments are closed.