पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहरात रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आज शहरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 265 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 535 रुग्ण बरे झाले आहेत.
पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 59 हजार 771 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 58 हजार 909 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 47 हजार 199 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 334 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 376 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 125 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 20 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-invasive ventilator) 14 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 18.35 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona Update | 535 corona patients discharged in Pune city in last 24 hours find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Heart Failure | ‘या’ कारणांमुळे होते हार्ट फेल ! वाचण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत