Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 77 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | Discharge of 77 patients of 'Corona' in Pune city, find out other statistics.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Corona | पुणे शहरात कोरोना (Pune Corona) नियंत्रणात आला असून दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मध्यंतरी रुग्णांच्या संख्येत चढ-उतार झाल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या आठशेच्या आसपास स्थिरावली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात आज दुपारी चार वाजेपर्यंत कोरोनाच्या (Pune Corona) 33 रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी 77 रुग्ण बरे (Recover) झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या होती. मात्र, आता पुण्यातील नवीन रुग्णांची (Pune Corona) संख्या कमी झाल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 830 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत शहरात 9 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही रुग्णांना आधिपासूनच वेगवेगळे आजार होते. (Pune Corona).

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

गेल्या 24 तासात तपासण्यात आलेल्या 4,269 प्रयोगशाळा तपासणीत 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात आतापर्यंत 37 लाख 97 हजार 735 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 08 हजार 323 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

त्यापैकी 4 लाख 98 हजार 384 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांत सध्या 81 गंभीर रुग्णांवर उचार सुरु आहेत. तर 66 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरु आहेत.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 77 patients of ‘Corona’ in Pune city, find out other statistics.

 

Subhash Desai | मंत्री सुभाष देसाईंचा मोठा दावा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पळवापळवी झाली’

Rupali Thombre Patil | ‘शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही’ – रुपाली ठोंबरे पाटील

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जागा हडपण्याचा प्रयत्न ! एस.आर. ए. डेव्हलपर्स च्या 4 भागिदारांसह वास्तुविद्या विशारदाविरूध्द FIR

Income Tax Return | लॉग-इन पासवर्ड विसरल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकत नाही का? अशा प्रकारे रिकव्हर करू शकता अकाऊंट

Gopichand Padalkar | बहुजनांना एकत्रित आणण्यासाठी पुण्यात ‘मल्हार महोत्सव 2022 ‘चे आयोजन; गोपीचंद पडळकरांनी दिली माहिती