पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 236 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 243 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86 हजार 905 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected
patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार 567 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका
हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2577 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2577 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 223 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6970 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title :- pune corona discharge of 243 patients of corona in the last 24 hours in pune city know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’