पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 106 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 126 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 3 हजार 175 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 93 हजार 055 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 01 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9064 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 1056 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 1056 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 166 रुग्ण गंभीर आहेत. तर 221 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5488 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 34 लाख 79 हजार 396 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | Discharge of 126 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics
- Pune Crime | पुण्यातील बड्या रुग्णालयात गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, शहरात प्रचंड खळबळ
- Sujay Vikhe Patil | पार्थ पवार-सुजय विखेंची अचानक भेट, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण
- Sharad Pawar On Modi Government | शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका; म्हणाले – ‘सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर’