पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 71 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 90 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रावर 4168 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 71 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Pune Corona) आला आहे. पुणे शहरात आजपर्यंत 37 लाख 62 हजार 071 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 7 हजार 799 पुणेकरांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या 24 तासात 90 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 951 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज दिवसभरात शहराबाहेरील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 9109 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या शहरामध्ये 739 सक्रिय रुग्ण (Active patient) आहे. यामध्ये 85 रुग्ण गंभीर आहेत. तर 54 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona | Diagnosis of 71 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics.