पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. काल पुण्यात 524 रुग्ण आडळून आले होते तर 36 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 444 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या वर गेली आहे.
शहरात आजपर्यंत 5 लाख 11 हजार 585 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 629 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरामध्ये सध्या 2838 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 101 रुग्ण गंभीर आहेत. तर 81 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6573 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 लाख 86 हजार 060 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)
Web Title : Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics
Pune Corona | पुणेकरांनो सावधान ! दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं ‘कोरोना’बाधित
Sameer Wankhede | अखेर समीर वानखेडेंची बदली, ‘या’ विभागात केली नियुक्ती